जळगाव जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दिलासा ; पाठटाचणाची सक्ती करण्यात येऊ नये- शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना आदेश.

Spread the love

भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांची मागणी मान्य

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे

शिक्षकांना लेसन प्लॅन काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे आदेश आज जळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले असून यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पाठटाचण काढण्याची सक्ती केली जात असल्याचा तक्रारी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्याकडे जिल्ह्यातील शिक्षकांनी केल्या होत्या या तक्रारींच्या अनुषंगाने अनिल बोरनारे यांनी जळगाव जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत शाळांना सूचना देण्याचे सांगितले होते.

त्यावरून शिक्षणाधिकार्यांनी आदेश काढले आहेत
शाळेतील प्रत्येक मूल वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असते त्यासाठी ज्ञानरचनावाद व एबीएल (ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग) शिक्षकांना उपयोगी पडते. त्यामुळे शिक्षकांना आपल्या अध्यापन पद्धतीत सातत्याने बदल करावा लागत असून पारंपरिक अध्यापन पद्धतीला आता पूर्णविराम दिला आहे.

याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाचे मा. सचिव नंदकुमार यांनी दिनांक २२ जून २०१५ च्या शासन निर्णयाच्या १३.१ मुद्द्याद्वारे शिक्षकांकडून दैनंदिन, मासिक, त्रैमासिक व वार्षिक नियोजनासारख्या कागदपत्रांची मागणी शाळांनी करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्यातील याबाबतची अंमलबाजवणीदेखील सुरू आहे
तथापि जळगाव जिल्ह्यात दैनंदिन पाठनियोजन करणेबाबत शिक्षकांना सक्ती केली जात होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार