सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांने विष प्राशन करून केली आत्महत्या

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील तांबोळा येथील रहिवासी उत्तम धोंडू चव्हाण यांनी सततच्या नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून केली विष प्रशांन करून केली आत्महत्या.


उत्तम धोंडू चव्हाण हे तांबोळा येथील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे पाच एकराच्या आसपास कोरडवाहू शेती आहे.करोडवहु शेती हे पावसाच्या भरोशावर असून पावसाच्या लहरीपणामुळे पुन्हा एका शेतकऱ्याला आपला जीव गमावा लागला आहे.20 ऑगस्ट रोजी उत्तम चव्हाण यांनी विष प्रशांन केले, त्यानंतर त्यांना लगेच लोणार येथील ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तब्येत चिंताजनक आहे.

त्यामुळे तुम्ही यांना उपाचारासाठी समोर घेऊन जाण्याचा सल्ला दिला,त्यानंतर बुलढाणा व बुलढाणा नंतर अकोला येथे सरकारी रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन गेले होते. परंतु उपचार चालू असताना 23 तारखेला पहाटे चार वाजेस प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात त्यांची बायको,एक मुलगा व चार मुली असा परिवार आहे.उत्तम चव्हाण यांच्या मुत्युनंतर गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार