गणेशोत्सव आणि पोळा सणात शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई.पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांची माहिती

Spread the love

सोयगाव, दि.२४…सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव काळात शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी बुधवारी दिला असून या आधीच पूर्वतायरीचा एक भाग म्हणून वारंट मधील प्रलंबित २२ आरोपींना हर्सूलची हवा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सोयगाव तालुक्यात शुक्रवारी बैलपोळा आणि दि.३१ आगस्ट पासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवसाठी सोयगाव पोलीस सतर्क झाले असून यासाठी अवैध दारूविक्रीवर निर्बंध घालण्यासाठी सोयगाव पोलीस ठाण्यात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

आगामी सण उत्सव निर्धोक साजरा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व मा पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांनी दिलेल्या सूचना देऊन मार्गदर्शन केले आहे. तसेच सदर सण उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी समाज कंटाकाना हेरून त्याची यादी तयार करण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अवैध दारू, जुगार व्यवसाय करणारे याची गोपनीय माहिती काढून छापा कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

पोलीस स्टेशन कडे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले वॉरंट बजावणी करून त्यांना अटक करून च मा न्यायालयात हजर करण्यात येत आहे. वॉरंट मध्ये आत्तापर्यंत 22 आरोपींना अटक करून मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी केलेली आहे. असे त्यांनी सांगितले

हे पण वाचा

टीम झुंजार