एरंडोलला शांतता समिती आणि मंडळाच्या पदाधिका-यांची बैठक.
झुंजार प्रतिनिधी एरंडोल- शहरातील सर्व गणेश मंडळांनी आणि भाविकांनी गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा असे आवाहन चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.रमेश चोपडे यांनी केले.गणेशोत्सवानिमित्त पोलीस स्थानकात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समिती सदस्य,गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि महिला दक्षता समिती सदयांच्या बैठकीत ते बोलत होते.शहरातील शांतता भंग करणा-या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.गणेशोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि शांतता समिती सदस्यांना शासकीय नियमांची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.रमेश चोपडे यांनी सर्व गणेश मंडळांनी कोणाच्या धार्मिक अथवा सामाजिक भावना दुखावणार नाहीत असे देखावे सादर करण्याचे आवाहन केले.समाजातील अनिष्ठ रूढी व परंपरा,स्त्री भरून हत्या,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा यासारख्या विषयांवर देखावे सादर करून समाजात जनजागृती करण्याचे सांगितले.शहरातील शांतता भंग करणा-या समाजकंटकांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केली.

अमळनेर विभागाचे पोलीस अधिक्षक राकेश जाधव यांनी शहरात ठिकठीकाणी सी.सी.टी.व्ही. बसविण्याची सुचना केली.अमळनेर येथे लोकवर्गणीतून ठिकठीकाणी बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्हींमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे सांगितले.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिका-यांनी शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले.गणेश मंडळाला लागणा-या विविध खात्यांच्या परवानगी प्राप्त करण्यासाठी पोलीस स्थानकात एक खिडकी योजना सुरु केली असल्याचे सांगितले.

रात्रीच्या वेळी प्रत्येक गणेश मंडळाने ग्रुहरक्षक दलाच्या जवानांसोबत मंडळाचे दोन स्वयंसेवक बंदोबस्तासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी सुचना केली.कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेल्या गणेशोत्सवाची मंडळाच्या पदाधिका-यांसह,भाविक,आणि पोलीस देखील आतुरतेने वाट पाहत असून,सर्वांनी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले.विसर्जन मिरवणुकीत मद्य प्राशन करून वाद घालणा-यांची पोलिसांतर्फे योग्य ती दखल घेतली जाईल असे सांगितले.हवालदार उमेश कुमावत यांनी यांनी गणेशोत्सवासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती पदाधिका-याना दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,मोहन चव्हाण,प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे,खंडित होणार वीजपुरवठा याबाबत सुचना केल्या.पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी सुत्रसंचलन केले.बैठकीस माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रवींद्र महाजन,किशोर निंबाळकर समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,

माजी नगरसेवक जहिरोद्दिन शेख कासम,असलम पिंजारी,डॉ.नरेंद्र पाटील,डॉ.सुधीर काबरा,अँड.अहमद सय्यद, ईश्वर बिऱ्हाडे, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,सुनील चौधरी, संजय पाटील,दशरथ महाजन,अनिल चौधरी, अमर साळी,लतीफ हाजी, डॉ.राखी काबरा,आरती ठाकूर,शालिनी कोठावदे,संध्या महाजन,उषाकिरण खैरनार,शोभना साळी,शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन यांचेसह गणेश मंडळाचे पदाधिकारी,शांतता समिती सदस्य उपस्थित होते.बैठकीसाठी हवालदार अनिल पाटील,पंकज पाटील,विकास खैरनार यांचेसह गृहरक्षक दलाच्या जवानांनी सहकार्य केले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






