वडगाव तेजन येथे शाळेसमोर गतिरोधक बसविण्यासाठी दिले निवेदन.

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे.

लोणार :- पंढरपूर शेगाव पालखी मार्गावरील लोणार ते मेहकर रोडवर वडगाव तेजन येथे गतिरोधक बसविण्यासाठी आज दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहूउद्देशीय संस्था वडगाव तेजन व शिवशंकर शिक्षण संस्था वडगाव तेजन तर्फे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यालय मेहकर येथे निवेदन देऊन गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली. त्या निवेदनाच्या प्रतिलिपी वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आल्या आहे.


सविस्तर असे की लोणार ते मेहकर महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून बऱ्याच जणांना स्वतःचे प्राण सुद्धा गमवावे लागले आहे.व असाच काही अनुचित प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसोबत व वडगाव तेजन येथील नागरिकांसोबत घडू नये म्हणून वडगाव तेजन येथील गावातून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर गतिरोधक बसविणे आवश्यक आहे.तसेच याच महामार्गाला लागून वडगाव तेजन बस स्टँड परिसरा जवळ असलेल्या सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच्या गेट समोर मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे.या मागणीसाठी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुउद्देशीय संस्था वडगाव तेजन व शिवशंकर शिक्षण संस्था वडगाव तेजन या दोन्ही संस्थेच्या मार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यालय मेहकर येथे निवेदन देऊन लवकरात लवकर गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा दोन्ही संस्थेमार्फत व गावकरी आणि पालक वर्गाकडून आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देऊन त्याची प्रतिलिपी पोलीस उपविभागीय कार्यालय मेहकर,पोलीस स्टेशन लोणार,तहसील कार्यालय लोणार व सर्व प्रसार माध्यमांना आपल्या प्रसिद्धीसाठी निवेदन देण्यात आले आहे.


सदर निवेदन देण्यासाठी वडगाव तेजन येथील पत्रकार सतीश पाटील तेजनकर व विनोद पाटील तेजनकर यांनी पुढाकार घेऊन दिलेल्या निवेदनामुळे वडगाव तेजन गावासह संपूर्ण परिसरातील नागरिक खुश होऊन निवेदना मार्फत केलेल्या गतिरोधक च्या मागणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार