VIDEO : अरे बापरे.. ; फणा काढलेला नाग पोराला चावणार तोच.. पाहा जाबाज आईचा जिगरबाज व्हिडिओ.

Spread the love

आईच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले मुलाचे प्राण


पावसाळ्याच्या दिवसांत अशाप्रकारच्या घटनांपासून आपण स्वत:ला जपायला हवे.

व्हिडिओमधील महिलेने अतिशय तत्परता दाखवून आपल्या मुलाचे प्राण कसे वाचवले ते दिसते.


कधी काय प्रसंग ओढावेल आणि आपला जीव धोक्यात येईल आपण काहीच सांगू शकत नाही. प्राण्यांमुळे होणारे अपघात तर अनेकदा आपल्या जीवावर बेतणारे असू शकतात. प्राणी केवळ जंगलातच असतात असा असा आपला समज असतो. पण कधी अचानक शहरात आलेला बिबट्या किंवा आणखी कोणता प्राणी आपल्यासाठी संहारक ठरु शकतो. इतकेच नाही तर मगर, नाग, साप यांमुळेही व्यक्तींचे जीव गेल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो.

पहा व्हिडिओ :

असाच जीवावर बेतणारा एक प्रसंग नुकताच समोर आला आहे. युट्यूबवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमधील महिलेने अतिशय तत्परता दाखवून आपल्या मुलाचे प्राण कसे वाचवले हे आपण पाहू शकतो .

द ट्रीब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना कर्नाटकातील मांड्या येथे घडली आहे. किंग कोब्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आईने मुलाला कडेवर घेतल्यामुळे त्याचे प्राण तर वाचलेच पण नंतर फणा उगारलेला कोब्राही शांतपणे आपल्या मार्गाने निघून गेल्याचे आपल्याला दिसेल. कदाचित मुलगा पाय देत असल्याचे वाटल्याने तो चिडला असेल आणि त्याने फणा उगारला असेल. पण हा कोब्रा जर चावला असता तर या लहानग्याच्या जीवावर बेतले असते हे नक्की. पावसाळ्याच्या दिवसांत अशाप्रकारच्या घटनांपासून आपण स्वत:ला जपायला हवे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार