जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
- अचानक येणार्या समस्येवर मात कराल. घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.
वृषभ :-
- दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.
मिथुन :-
- उत्तम वाचन होईल. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.
कर्क :-
- चांगले साहित्य वाचनात येईल. घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.
सिंह :-
- बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. अति विचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल.
कन्या :-
- जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा.
तूळ :-
- दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल.
वृश्चिक :-
- सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. छंद जोपासायला वेळ काढावा लागेल. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्यांनी भडक शब्द वापरू नयेत. एखादी घटना द्विधावस्था वाढवेल.
धनू :-
- बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत असेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.
मकर :-
- ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो.
कुंभ :-
- दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल
मीन :-
- शांतपणे बोलून कामे करून घ्या. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






