जळगाव प्रतिनिधि:- कु-हाड बु. ता पाचोरा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच श्री उदयसिंग लखिचंद राठोड यांनी खाजगी मालकीची जागा मिळकर असतांना देखील सरकारी गावठान जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून श्री राजू सखाराम राठोड व श्री राजू भूरा राठोड यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सखोल चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून इंदिरा आवास योजनेतुन राहते घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे,
जिल्हाधिकारी श्री डॉ. अभिजित राऊत. यांनी श्री उदयसिंग राठोड यांना सरपंच व सदस्य पदावरुन नुकतेच अपात्र ठरविले आहे. या बाबत सर्विस्तर वॄत असे कि सरपंच श्री उदयसिंग राठोड यांचे नावे जागा मिळकत क्र 15 ही खाजगी जागा असतांना त्यांनी ग्रा प. जागा मिळकत क्र. 210 या सरकारी जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण करुण घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे व एकत्र कुटुंब सह लाभ घेत असल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे.
म्हणून श्री राजू सखाराम राठोड व श्री राजू भूरा राठोड यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे विवाद अर्ज क्र-27/ 022.ने तक्रार दाखल केली असता त्यावर कायदेशीर सुनावणी होऊन सरपंच यांनी स्वतःची खाजगी जागा मिळकत असताना देखील शासकीय गावठान जागा क्र 210 या जागा मिळकती वर इंदिरा आवास योजनेतुन घरकुल बांधकाम केले आहे तसेच सार्वजनिक जागेवर 16फुट जादा वाढीव बांधकाम केलेले आहे. सरपंच यांनी स्वत: ची खाजगी जागा सुरक्षित ठेऊन शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे.
जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी उदयसिंग लखिचंद राठोड यांना ग्रा.प.सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.या निकाला मुळे ग्रामस्थांन म्हधे समाधानाचे वातावरण तयार झाले असुन. जिह्यातील ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेत खळबळ उडाली आहे. तक्ररदार श्री राजू राठोड व श्री राजू भूरा राठोड. यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले.(पिंपरखेड) यांनी काम पाहिले. या निकाला कडे तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.