लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोळा हा सण मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला.शेतकऱ्याचा खरा मित्र त्याच्या सुखदुःखातला साथीदार ज्याच्या भविष्यावर तो कष्ट करून घाम गोळा घालून शेती फुलवतो,बैलांनी वर्षभर केलेल्या श्रमाचे कृतज्ञतापूर्वक कौतुक करण्यासाठी मालकाने त्यांच्या पाठीवर हात फिरवावा,त्याच्या कष्टाची जाणीव ठेवून अन्नदात्याला हात जोडत बैल जोडीला संपूर्ण देशाला सुजराम सुफलम ठेवण्याचे आशीर्वादाने मागवा.तो दिवस म्हणजे पोळा शेतकऱ्यांसाठी वर्षभर आपल्या खांद्यावर आऊत फाट्याचे गाडीचे ओझे वाहतात.त्याची जाणीव ठेवून शेतकरी पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलाच्या खांद्याला दूध,तुप आणि हळद लावून पळसाच्या पाच पाणी देठवा व मोळ याने शकतात मालिश करतात.त्याच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे ‘पोळा’ या सणाला ‘बैलपोळा’असेही म्हणतात.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते.सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.
शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्याचा सखा,मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो.पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात.शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते.
गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात.अशा नाना तर्हेने सजविण्यात येते.शेतकर्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात.तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते.घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात.त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात.या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धि होते,अशी समजूत आहे.पशुपूजेच्या ह्या प्रकाराचे मूळ मानवाने ज्या काळात पशुपालनास आरंभ केला,त्या प्राचीन अवस्थेत असणे शक्य आहे.
परंतु आजचे युग तंत्रज्ञानाचा युग आहे,त्यामुळे गावातील दिवसेंदिवस बैल जोड्यांची क्रमाने कमी होत आहे.बैलाची जागा आज ट्रॅक्टरने घेतल्यामुळे शेतकऱ्याला आपले शेतीची मशागत करण्यासाठी बैलाऐवजी आता ट्रॅक्टरचा जास्त प्रमाणात वापर होत आहे,त्यामुळे काही कालांतराने बैल फक्त नावाला शिल्लक राहतील असे दिसत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






