सालाबादाप्रमाणे कुऱ्हाड येथील शेतकरी सोनू शांताराम चौधरी यांनी 30001 रु बोली बोलून मिळविला पोळा फोडण्याचा मान.

Spread the love

चेतन पाटील / कुऱ्हाड प्रतिनिधी


पाचोरा :- पोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला महाराष्ट्रात साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.
हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात.

या दिवशी बैलाच्या खांद्याला ,मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला ‘खांद शेकणे’ अथवा ‘खांड शेकणे’ म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल पाठीवर घालायची शाल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा आवरायची दोरी पायात चांदीचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ सालदारास नवीन कपडे देण्यात येतात.

या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या दरवाजावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी गावातील प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस बोली बोलली जाते ,ज्याची बोली जास्त त्या शेतकर्याचा मानाचा बैल तोरण तोडतो व पोळा ‘फुटतो’. नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार