पोळ्याचा उत्साहात बैलाचा हृदय विकाराने निधन

Spread the love

सोयगांव दि २६(प्रतिनिधी )येथे पोळ्याचा उत्साह सुरु असतांना एका बैलाचा हृदय विकाराने निधन झाले. सोबतीचा बैल पोळ्यात फिरवून दुसऱ्या घेऊन जाण्यासाठी घरी आलेल्या शेतकऱ्याला आपला दूसरा बैल मृत अवस्थेत दिसताच शेतकऱ्याने हंबरडा फोडला त्यामुळे सोयगावांत हळहळ व्यक्त होत आहे.

सोयगांव येथे आज पोळ्याचा उत्साह सुरु होता. जुना बाजार चौक परिसरात गावातील बैल तोरणाखालून काढण्यासाठी शेतकरी आपापले बैल सजवून पळवत होते. तरुण शेतकरी किरण शिवाजी गायकवाड याने आपला एक बैल पोळ्या सजवून तोरणा खालून काढला. दूसरा घेण्यासाठी गोठ्यात पोहचला तिथे मात्र त्याचा दूसरा बैल मरून पडलेला होता.

सजवलेला बैल मृत अवस्थेत पाहून किरण ने हंबरडा फोडला वर्षभर सोबत राबणाऱ्या सर्जा राजा च्या जोडीच्या आनंदाच्या दिवशी म्हणजे पोळ्याला बैल सोडून गेल्यामुळे किरण यांस अश्रू अनावर झाले. इतर शेतकऱ्यांनी त्यास धीर दिला घटनेची माहिती होताच पोळ्यातील इतर शेतकऱ्यांनी याविषयी हळहळ व्यक्त केली.संबंधित शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार