दौंड (रवी देसाई) : सर्व गणेश मंडळांनी शासनाचे सर्व नियम पाळून रीतसर परवानगी घेऊन डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी आवाहन केले आहे. 31 ऑगस्टपासून साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाकरिता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्या नियमाचे पालन करावे व काय उपाययोजना करावे यासंबंधी मार्गदर्शन करण्याकरिता दौंड पोलीस स्टेशन तर्फे सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड येथे मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये सर्व प्रशासकीय खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहुल धस म्हणाले की, दौंड पेक्षा मोठ्या शहरांमध्ये डीजे चा वापर बंद झालेला आहे. त्यामुळे दौंड मध्ये सुद्धा गणपती उत्सवाकरिता डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्याचा वापर करावा असे मंडळांना आवाहन करून सर्वजण कायद्याचे पालन करतील, कोणीही कायदा मोडणार नाही. जर कायदा मोडल्यास त्याची गय केली जाणार नाही,
असे शेवटी राहुल धस म्हणाले. त्यानंतर यावेळी दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले की, लोकांना अडचण होईल असे रस्त्यावर स्टेज कोणीही उभारू नये तसेच नियमांचे पालक करावे. त्यानंतर एम. एस. सी. बी चे धावडे साहेब यांनी सांगितले की, दहा दिवसाकरिता मंडळांनी ऑनलाइन एप्लीकेशन करून रीतसर मीटर घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, सोहेल खान यांची भाषणे झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस, दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, नायब तहसीलदार स्वाती नरोटे तसेच शहरातील व तालुक्यातील मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






