तीन महिन्यापूर्वीच्या भांडणाचा राग, गल्लीतील तरुणाचे महिलेसोबत भयंकर कृत्य
यावल प्रतिनिधी
यावल :- सध्या महाराष्ट्रात घातपात ( खुनाच्या ) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चितोडा येथील तरुणाच्या खून प्रकरणास पाच दिवस उलटत नाही तोच शनिवारी रात्री महिलेचा खून झाल्याची घटना घडलीय. यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावल शहरातील काजीपूर भागात महिलेची वादातून कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आली. नाजीया खलील काजीअसे मृत महिलेचे नाव असून या खून प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
यावल शहरातील काजीपुरा वस्तीतील नाजीया खलील काजी या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून संशयित आरोपी जावेद युनूस पटेल (वय २३) रा. काजी वाडा याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.
घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. ही खबर वाऱ्यासारखी पसरताच परिसर हादरला.यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषित केले. यात जावेद युनूस पटेल, रा. काजीपुरा या संशयितास ताब्यात घेण्यात आले. मृत महिलेचे पती खालील काजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान या घटनेने शहर हादरले आहे. विविध भागात बंदाेबस्त तैनात करण्यात आला.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन