लोणार/उध्दव आटोळे
जैन समाजबांधवांच्या वतीने आज 28 ऑगस्ट रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली दुपारी एक वाजता या शोभायात्रेला सुरुवात झाली अबाल वद्धासह महिला पुरुष मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
बुधवार 24 ऑगस्ट पासून आठ दिवसीय पर्युषण पर्व सुरू झाले आहे या आठ दिवसात जैन समाज बांधवांचे सकाळी सहा वाजेपासून धार्मिक कार्य सुरू होतात नऊ वाजता प्रवचन दुपारी पूजा, कल्पसूत्र वाचन तथा संध्याकाळी सात वाजता प्रतिक्रमण तसेच भक्ती संध्या व लहान मुलांचे धार्मिक कार्यक्रम अशा प्रकारे संपूर्ण आठ दिवसाची दिनचर्या आहे यावर्षी स्वाध्यायी म्हणून चिन्नई येथून दिनेश भाई,सम्यकभाई, तरुणभाई आलेले आहेत रविवारी कल्पसूत्र वाचन दरम्यान पाचव्या दिवशी भगवान महावीरांच्या जन्माकल्याणकाचे वाचन करण्यात येते त्यामुळे आज शहरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला .
दुपारी एक वाजता जैन मंदिरापासून रथात भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवून शोभायात्रा काढण्यात आली प्रताप चौक, सराफ लाईन या मार्गे फिरून आनंद मंगल भवन येथे शोभायात्रा विसर्जन करण्यात येउन लोणार येथे चातुर्मास निमित्त उपस्थित प.पू अनुप्रेक्षाजी म.सा.आदी ठाणा 3 नी भगवान महावीरांच्या जीवनावर प्रकाश टाकला सोबतच पर्युषण पर्वाचे महत्त्व सांगितले या शोभायात्रेची धुरा मुनीसुव्त संगीत मंडळाने सांभाळली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






