- कार रेस जिवावर बेतली:धडकेने विक्रांत 20 फूट हवेत फेकला; झाडावर अडकली सायकल, जळगावातील मेहरुण ट्रॅकवरील घटना
जळगाव, (प्रतिनिधी) :- सध्या महाराष्ट्रात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरात एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे.शहरातील मेहरूण तलावाजवळ कारची रेस लावलेल्या एका कारने सायकलीने जाणाऱ्या मुलाला उडविल्याने मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक २८ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. विक्रांत मिश्रा असे अपघातमध्ये ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.
विक्रांत मिश्रा हा आई व वडील यांच्यासह एकनाथ नगर येथे राहत असून तो मेहरून तलावाजवळील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होता. आज रविवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याचा काकाचा मुलगा सुनील जितेंद्र मिश्रा यांच्यासोबत मेहरून ट्रॅकवर सायकलवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कार यांची रेस लावण्यात होती. यामधील एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सायकलवरील विक्रांतला सायकलीसहीत उडविले. हा अपघात एवढा भीषण होता की, विक्रांत हा चेंडूसारखा वर उलाला.. तर त्याची सायकल झाडाला अडकली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जखमीवस्थेत विक्रांतला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. या गुन्ह्यातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
विक्रांतला जाेरदार धडक
रामेश्वर काॅलनीत राहणार विक्रांत संताेष मिश्रा हा 11 वर्षीय मुलगा त्याचा चुलत भाऊ जितेंद्र याच्या साेबत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेहरुण जाॅगिंग ट्रॅकवर सायकल फिरविण्यासाठी गेला हाेता. काही वेळ त्यांनी सायकल चालविली. त्यानंतर घराकडे परतत असताना तलावाकडून रामेश्वर काॅलनीकडे जाणाऱ्या मार्गावरून जात असताना साडेतीन वाजेच्या सुमारास मागून जाेरात स्पीडने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनाेव्हा कार क्रमांक एमएच 19 बीयू 6606 या कारने त्या विक्रांत याला जाेरदार धडक दिली.
जागीच झाला विक्रांतचा मृत्यू
कारची धडक एवढी जाेरदार हाेती की, विक्रांत हा सायकलीसह हवेत 20-25 फूट फेकला जावून ट्रॅक शेजारील झाडावर त्याची सायकत लटकली व ताे झाडावर आदळून पून्हा वेगात जमिनीवर येऊन पडला. यात त्याच्या डाेक्याला जबरदस्त मार लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
चालक कारसह फरार
जबरदस्त धडकेच्या आवाजाने ट्रॅकवर फिरायला आलेल्या तसेच व्यवसाय करणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील काही जणांनी विक्रांतला उचलून सिव्हील मध्ये आणले. यावेळी काही अंतर पुढे जाऊन कार थांबली. त्यातून तीन तरुण खाली उतरले. तेवढ्यात कारचालक तरुण कारसह फरार झाला. ते तिघेही पळून जाणाचा प्रयत्नात असताना नागरिकांनी पकडून सिव्हीलमध्ये आणले. पाेलिस चाैकीत नेऊन त्यांना मारहाण केली.
एकुलता एक मुलगा
विक्रांत हा अजिंठा चाैफुली जवळील सुरेशदादा शाॅपिंग काॅम्प्लेक्स मध्ये रावडी इलेट्राॅनिक्स नावाने व्यवसाय असणारे संताेष मिश्रा यांचा एकुलता एक मुलगा असून ताे विद्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता चाैथीत शिक्षण घेत हाेता.
उद्या हाेणार शवविच्छेदन
विक्रांत याला सिव्हीलमध्ये आणल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर डाॅक्टरांनी त्याला मयत घाेषित केले.त्याचे शवविच्छेदन साेमवारी सकाळी हाेणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस स्टेशनचे पाेलिस उपनिरिक्षक अमाेल माेरे यांच्यासह त्यांची टीम सिव्हीलमध्ये दाखल झाली हाेती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याचे काम सुरू हाेते. तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून कारचालक तरुणाचा व दुसऱ्या कारसह त्यातील तरुणांचा शाेध पाेलिस घेत आहेत.
विक्रांतला जाेरदार धडकरामेश्वर काॅलनीत राहणार विक्रांत संताेष मिश्रा हा 11 वर्षीय मुलगा त्याचा चुलत भाऊ जितेंद्र याच्या साेबत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेहरुण जाॅगिंग ट्रॅकवर सायकल फिरविण्यासाठी गेला हाेता. काही वेळ त्यांनी सायकल चालविली. त्यानंतर घराकडे परतत असताना तलावाकडून रामेश्वर काॅलनीकडे जाणाऱ्या मार्गावरून जात असताना साडेतीन वाजेच्या सुमारास मागून जाेरात स्पीडने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनाेव्हा कार क्रमांक एमएच 19 बीयू 6606 या कारने त्या विक्रांत याला जाेरदार धडक दिली.जागीच झाला विक्रांतचा मृत्यूकारची धडक एवढी जाेरदार हाेती की, विक्रांत हा सायकलीसह हवेत 20-25 फूट फेकला जावून ट्रॅक शेजारील झाडावर त्याची सायकत लटकली व ताे झाडावर आदळून पून्हा वेगात जमिनीवर येऊन पडला. यात त्याच्या डाेक्याला जबरदस्त मार लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला.चालक कारसह फरारजबरदस्त धडकेच्या आवाजाने ट्रॅकवर फिरायला आलेल्या तसेच व्यवसाय करणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील काही जणांनी विक्रांतला उचलून सिव्हील मध्ये आणले. यावेळी काही अंतर पुढे जाऊन कार थांबली. त्यातून तीन तरुण खाली उतरले. तेवढ्यात कारचालक तरुण कारसह फरार झाला. ते तिघेही पळून जाणाचा प्रयत्नात असताना नागरिकांनी पकडून सिव्हीलमध्ये आणले. पाेलिस चाैकीत नेऊन त्यांना मारहाण केली.एकुलता एक मुलगाविक्रांत हा अजिंठा चाैफुली जवळील सुरेशदादा शाॅपिंग काॅम्प्लेक्स मध्ये रावडी इलेट्राॅनिक्स नावाने व्यवसाय असणारे संताेष मिश्रा यांचा एकुलता एक मुलगा असून ताे विद्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता चाैथीत शिक्षण घेत हाेता.उद्या हाेणार शवविच्छेदनविक्रांत याला सिव्हीलमध्ये आणल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर डाॅक्टरांनी त्याला मयत घाेषित केले.त्याचे शवविच्छेदन साेमवारी सकाळी हाेणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस स्टेशनचे पाेलिस उपनिरिक्षक अमाेल माेरे यांच्यासह त्यांची टीम सिव्हीलमध्ये दाखल झाली हाेती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याचे काम सुरू हाेते. तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून कारचालक तरुणाचा व दुसऱ्या कारसह त्यातील तरुणांचा शाेध पाेलिस घेत आहेत.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.