धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव : – तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील महिलेचा चिंचपुरा गावाजवळील एका विहिरीत कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, महिलेची आत्महत्या की, खून याबाबत गावात तर्क – वितर्क सुरू आहे. यासंदर्भात अधिक असे की, आज येथून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडील शेतातील विहिरीत अनिल भिलाला यांच्या पत्नीचा कुजलेला अवस्थेत मृतदेह दि.२८ ऑगस्ट, रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आढळून आला.
संबंधित महिला मागील दोन – तीन दिवसापासून बेपत्ता होती, अशी माहिती समोर येत आहे. ही महिला पावरा समाजातील असून तीचा पती आणि ती पिंप्री येथे गेल्या अनेक दिवसांपासून वास्तव्यास होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिलेचा मृतदेह तरंगतांना काही लोकांना दिसला. त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली.
सदर महिलेचे माहेर बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथील असल्याचे कळते. सदर घटनेची माहिती पिंप्री व चिंचपुरा येथील पोलिस पाटील व सरपंचांनी धरणगाव पोलिसात दिली. माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह विहिरीतून काढण्याचे काम सुरु होते. मृत महिलेचे नातेवाईक बुऱ्हानपूर येथून येणार असल्याचे कळते. मयत महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, ही दुर्घटना विहिरीत हत्या की आत्महत्या ?, हे पोलीस तपासातच समोर येणार आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






