शरद पवार यांनी आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भारत विरुद्ध पाकिस्तान या संघादरम्यान सुरु असलेल्या सामन्याचा आनंद घेतला. अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी सामन्याचा आनंद लुटला. त्यांच्या साथीला मॅच पाहायला त्यांच्या नातवांची उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय आणि सुप्रिया यांच्या कन्या रेवती यांनी आपल्या आजोबांशेजारी बसून सामन्याचा आनंद लुटला. जेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला तेव्हा शरद पवार यांनी नावतांच्या साथीने अनोख्या शैलीत विजयाचं सेलिब्रेशन केलं.
मुंबई :- आशिया चषक २०२२ मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करुन स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्स राखून पराभव केला. भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पुन्हा आपला जलवा दाखवून आपणच मॅचविनर असल्याचं सिद्ध केलं. पहिल्यांदा स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमारने भेदक मारा केला. त्याला हार्दिकनेही उत्तम साथ दिली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या शॉर्ट बॉलसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. पाकिस्तानच्या १४८ धावांचा पाठलाग भारताने ५ विकेट्स गमावून केला. या विजयासह भारताने आपल्या अपमानाचा बदलाही घेतला. पाकिस्तान संघाने २०२१ साली भारताला १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. याच पराभवाची भारताने आज सव्याज परतफेड केली. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा होत आहे. कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत फटाके वाजत आहेत, लोक आनंदाने नाचत आहेत. दरम्यान, देशाचे ज्येष्ठ नेते तथा ज्यांच्याकडे एकेकाळी जगाच्या क्रिकेटचं नेतृत्व होतं, त्या शरद पवार यांनीही भारताच्या विजयाचं खास सेलिब्रेशन केलं. आपले दोन्ही हात उंचावून त्यांनी विजयी सेलिब्रेशन केलं, तसेच भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छाही दिल्या.
शरद पवार यांनी आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भारत विरुद्ध पाकिस्तान या संघादरम्यान सुरु असलेल्या सामन्याचा आनंद घेतला. अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी सामन्याचा आनंद लुटला. त्यांच्या साथीला मॅच पाहायला त्यांच्या नातवांची उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय आणि सुप्रिया यांच्या कन्या रेवती यांनी आपल्या आजोबांशेजारी बसून सामन्याचा आनंद लुटला. जेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला तेव्हा शरद पवार यांनी नावतांच्या साथीने अनोख्या शैलीत विजयाचं सेलिब्रेशन केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ ट्विट केला आहे. आपले दोन्ही हात उंचावून भारतीय संघाला शुभेच्छा देत पवारांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
पहा व्हिडिओ :
क्रिकेटवेडे पवार !
पवार जेथे पाय ठेवतात ते त्या खेळाचे, जागेचे, वास्तूचे आणि समाजाचे होऊन जातात. पवार २००१मध्ये ‘मुंबई क्रिकेट संघटने’च्या निवडणुकीत उतरले, त्यावेळी त्यांचा क्रिकेटशी संबंध फक्त सदू शिंदे या भारताच्या माजी क्रिकेटपटूंचे जावई एवढाच आहे, अशी चर्चा झाली. पवारांचे पहिले पाऊल मुंबई क्रिकेटच्या कार्यकारिणीत पडले आणि आज उभी असलेली संघटनेची वास्तू उभी राहिली. बीसीसीआयचे मुख्यालय तेथे थाटण्यात आले. पवार तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या कांदिवली आणि वांद्रे येथे आणखी दोन भव्यदिव्य वास्तू उभ्या केल्या. सदस्यांसाठी, क्रिकेटपटूंसाठी तेथे सन्मानाने जाण्याची हक्काची सेवा उपलब्ध करून दिली. या दोन वास्तूंची उभारणी केवळ आणि केवळ पवारांच्या कौशल्यामुळे आणि कामाच्या वेगामुळेच होऊ शकली. पवारांनी क्रिकेट संघटनांना जसे मोठे केले, तसे खेळाडूंनाही. पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना, क्रिकेटपटूंनी विश्वचषक विजेतेपदानंतरची बक्षिसी प्रेमाने वाढवून घेतली.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.