VIDEO : अरे बापरे! चंद्रपुरात डोळ्यादेखत ७० फूट जमिनीत गाडलं गेलं घर

Spread the love

चंद्रपूर : – राज्यात सनासुदीचे वातावरण असताना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहराला लागत असलेल्या घुग्गुस गावात एक घर अचानक ७० फूट जमिनीमध्ये गडप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोसळा खाणींचा भाग असलेल्या आमराई वार्डात हा प्रकार घडला असून लोकांच्या नजरेसमोर घर गडप होण्याच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आमराई वार्डात गजानन मडावी यांचं घर होतं. दरम्यान या घराला अचानक हदरे बसू लागल्याचं लक्षात आले त्यामुळे घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतली. दरम्यान, घरातून बाहेर पडताच हे घर ७० फूट जमिनीत गडप झालं.दरम्यान या अचानक घडलेल्या प्रकारमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखीलनागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

पहा व्हिडिओ :

दरम्यान, सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर ७० फूट खोल जमिनीत गडप होण्याची ही पहिलीच घटना आहे.

हे वाचलंत का ?


टीम झुंजार