धरणगाव :- येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रयोग व संशोधनाच्या माध्यमातून आता अंध व्यक्तींसाठी एक सेन्सिटिव्ह स्टिक बनवली आहे .त्यांनी बाल संस्कार केंद्र दिंडोरी नाशिक मार्फत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केले आहे.
या काठीचे महत्व असे आहे की अंध व्यक्ती रस्त्याने चालत असताना पाच फुटावरती धोक्याची संकेत ही काठी त्या अंध व्यक्तीला सांगणार आहे. त्याचप्रमाणे या काठीमध्ये असे एक यंत्र असेल की त्या यंत्राच्या माध्यमातून त्यांच्या घरातील सदस्यांना आपला घरातील अंध व्यक्ती सध्या कोणत्या ठिकाणी आहे हेही तात्काळ कळु शकेल असं वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांनी एक नवीन तंत्र शोधून खऱ्या अर्थाने अंधांसाठी खूप मोठी मदत उपलब्ध करून दिलेली आहे
चि. यशोदीप मधुकर पालीवाल. इयत्ता दहावी (क ) व चि. सुमित वासुदेव चौधरी इयत्ता नववी( ब ) यांचे संस्थेचे सचिव प्रा रमेश महाजन तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एस पाटील, प्राथमिकचे विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय विज्ञान शिक्षक वाय.डी .चिंचोरे सर यांनी या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






