GPS मध्ये साकारला इको फ्रेंडली गणपती बाप्पा

Spread the love

|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्य सर्वदा ||

धरणगाव ( पाळधी ) :- ह्या श्लोकाने भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या भल्या मोठ्या प्रांगणात, कला शिक्षिका सौं.प्रिती पाटील मॅडम यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी शाळू मातीचा इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवायला सुरुवात केली बघता बघता चिमुकल्यांनी गणपती बाप्पा बनवला सुद्धा आणि नंतर त्यांच्या ओठांवर आलं ते हेच गाणंं

माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरया किती गोड दिसतो…… ????

मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला खूप काही सांगून जात होता. दररोज होमवर्क पूर्ण हवा!असं सांगणारे शाळेचे प्रिन्सिपल सचिन पाटील सर यांनी सुद्धा स्वतः हाताने बाप्पा बनवून दाखवला.
शाळेतील कला शिक्षिका सौ प्रीती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून गणपती बाप्पा साकारला. शाळेचे चेअरमन विक्रम गुलाबरावजी पाटील यांनी नवनवीन प्रकारच्या कलाकृती पाहून विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले……..
आणि सर्वांना येणाऱ्या 31 ऑगस्ट2022 रोजी श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.


GPS परिवाराने सुरू केलेल्या गणेशोत्सवाचं हे दुसरे पर्व आहे, आपल्या नाविन्यपूर्ण साजरीकरणाने जीपीएसचा गणेशोत्सव ओळखला जातो. शाळेच्या कलाशिक्षका सौं.प्रीती चौधरी मॅडम यांच्या कलागुणांचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी, इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्याचीं कार्यशाळा घेऊन सदर वर्षाच्या गणेशोत्सवाची धडाक्यात सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यशाळेला संस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, विक्रम गुलाबरावजी पाटील सर यांची विशेष उपस्थिती लाभली, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री सचिन पाटील सर यावेळी उपस्थित होते. शाळेच्या कलाशिक्षिका सौ प्रीती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनात जीपीएस परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग सदर कार्यशाळेत नोंदवला.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार