अंथुर्णे वार्ड क्रं १ उखळमाळ येथील महिलांचे अंथुर्णे ग्रामपंचायत कार्यालयासमोर चूल पेटवून तीव्र आंदोलन.

Spread the love

प्रतिनिधी – संतोष कदम.


अंथुर्णे :- ( ता. इंदापूर )
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारत सरकारने हर घर तिरंगा अभियान राबवले गेले. मात्र अंथुर्णे येथील वार्ड क्रमांक १ उखळमाळ येथील नागरिक, महिलांना राहण्यासाठी घरे नाहीत ते बेघर आहेत. त्यांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिक, महिलांनी चुल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले.


यावेळी अंथुर्णे ( मु ) उखळमाळ या मधील नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळणे बाबत. उखळमाळ येथील नागरिकांच्या वतीने मा. ग्रामसेवक व सरपंच, सदस्य बॉडी ग्रामपंचायत अंथुर्णे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे. आम्ही 1952 पासून अंथुर्णे गावचे रहिवासी असून अजूनही आम्ही बेघर अवस्थेत जीवन जगत आहे. तरी आम्हाला ग्रामपंचायतीकडे जागा शिल्लक असताना सुद्धा आमच्याकडे दुर्लक्षित केले जाते. परंतु आज दि. ३०/८/२०२२ रोजी आम्ही गट क्रमांक ( ८८ ) मधील गायरान शिल्लक जागा आम्हाला नोंदणी करून आम्हाला द्यावी. अशी नम्र विनंती केलेली आहे.


यावेळी संतोष कांबळे, शेखर काटे, राजू भोसले, अतुल बनसोडे, सुनील केंगार, संजय वंचाळे, संजय धिमधिमे, स्वप्निल धिमधिमे, सतीश भोसले, नाना गोसावी, सुरेश कांबळे, दीपक बनसोडे, मनोज रणदिवे, बबलू सोनवणे, ऋषिकेश लोंढे.शितल साबळे , बायडाबाई कांबळे, विमल सोनवणे, रेखा वंचाळे, लक्ष्मी वंचाळे, मंदा कांबळे, मंगल कदम, अनिता सोनवणे, सुनिता खरात, कमल गवळी, विठाबाई मोरे, नगीना वाघमारे, करुणा मोठे, सुमन कांबळे, केसर मोरे आदी युवा वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होता.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार