चोपडा (प्रतिनिधी) शाळेत शिकणारी मुले हे भारताचे उद्याचे भविष्य आहे.आणि त्याला ज्ञानर्जन करणाऱ्या शिक्षकाचे कामकाजाचे मूल्यमापन करून तो शिक्षक कुठेतरी गौरवीला गेला पाहिजे या भावनेतून संपूर्ण यावल प्रकल्पातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे येत्या काळात गौरविण्यात येतील.हा उपक्रम स्तुत्य स्वरूपाच्या असून उपक्रमशील शिक्षक आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी यातून प्रेरणा घेतील हे मात्र नक्की.
आजतागायत प्रत्येक उपक्रमशिल शिक्षकाची माहिती व त्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा तसेच त्याच विद्यालयातील मुख्याध्यापकांचा अभिप्राय हा दिनांक ०५ सप्टेंबर पूर्वी प्रकल्प कार्यालय यावल यांच्याकडे सुपूर्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सदर उपक्रमाबद्दल यावल प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे या आग्रही असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आदिवासी दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे त्यांचे मत आहे.आलेल्या सर्व प्रस्तावांमधून योग्य त्या आदर्श शिक्षकाची निवड करण्यात येईल अशी माहिती यावल प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांनी लोकशाहीशी बोलताना दिली.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






