नंदुरबार, (प्रतिनिधी) :- खान्देशातील धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा अठ्ठारीपाडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नासाठी ३ लाख ६० रुपयामध्ये चक्क विक्री करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीची ३ लाख ६० रुपयामध्ये विक्री…
सुक्रिया महाडीक याच्या मध्यस्थीने सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद यास पीडित मुलीला ३ लाख ६० रुपयामध्ये विक्री केली. त्याने संशयित आरोपींच्या उपस्थितीत लग्न केले. गोविंद याने लग्न करुन त्याच्या घरात वेळोवेळी अल्पवयीन पिडीताचे इच्छेविरुध्द जबरीने अत्याचार केला.
घरच्यांना खोटं सांगून आधी पळवून नेले….
धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा अठ्ठारीपाडा येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ७ मार्च २०२२ रोजी संदिप सुकलाल पावरा व संगीता संदिप पावरा यांनी पाहुणी म्हणुन घरी घेऊन जातो असे मुलीच्या घरच्या खोटं सांगुन टेंभुर्णी सोलापूर येथे पळवून नेले होते.
पोलिसात गुन्हा दाखल
दरम्यान याबाबत पिडीत मुलीच्या नातलगांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुक्रिया महाडीक (रा.टेंभुर्णी ता.म्हाढा, जि. सोलापूर), सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद (रा.आलेगाव ता. म्हाढा, जि.सोलापूर), संदिप सुकलाल पावरा, संगीता संदिप पावरा (रा.राडीकलम, धडगाव), गोविंदची आई व गोविंदची वडील (दोनही रा.आलेगाव, ता.म्हाढा, जि.सोलापूर)यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२), (एन) ३६६ (अ), ३७२, ३७३ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण २०१२ चे क ५ (एल) ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






