मुंबईत विसर्जनासाठी १५० कृत्रिम तलाव

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विसर्जन करण्यासाठी मुंबई महापालिका यावर्षी १५० कृत्रिम तलाव उपलब्ध करून देणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना मनपाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत समुद्र अथवा नैसर्गिक स्रोतांमध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत एकूण १५० कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणाचे होणारी हानी लक्षात घेऊन पीओपीवर बंदी घातली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये बंदी आदेशांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यंदा सुरू झालेला गणेशोत्सव आणि मूर्तिकारांनी तयार केलेल्या पीओपीच्या गणेशमूर्ती लक्षात घेऊन त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

मुंबईमधील घरगुती गणपतींची संख्या लक्षात घेऊन पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी मुंबईत ८८ कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा घातलेले बंधन लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी एकूण १५० कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार