पितृपक्षात अन्नदान पुण्यकर्मा संकल्प

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच “पितृपक्ष” वा “श्राद्धपक्ष”, आपले आप्त ज्या तिथीला स्वर्गवासी झाले असतील, त्या तिथीला पिंडदान इत्यादी धार्मिक विधी करून पितरांच्या नावे अन्नदान केले जाते. परंतु हे नेहमीच शक्य होईल असे नाही. या साठीच गेली अनेक वर्षे “स्वामी”च्या माध्यमातून गरीब-दीन दुबळ्यांना अन्नदान केले जाते.

ह्यावर्षी पितृपक्ष शनीवार दि. १० सप्टेंबर २०२२ ते रविवार दि. २५ सप्टेंबर २०२२ या काळात गरीब-दीन दुबळ्यांना व मुंबईत बाहेर गावाहून उपचारार्थ येणार्‍या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धान्य वाटप करण्यात येईल.

धान्य / रोख रक्कम / धनादेश यापैकी आपणांस जे शक्य असेल त्या द्वारे स्वहस्ते दान करता येईल. स्वामी तर्फे अशाप्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

अधिक माहितीसाठी संपर्क : साध्वी डोके ९८६९४५११५३ सुरेन्द्र व्हटकर ९८२०४१६३०५

टीम झुंजार