जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
विनाकारण आक्रमकता दाखवू नका. नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. मेहनत फळाला येईल.
वृषभ :-
- बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील..
मिथुन :-
- दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा. भाग्याची चांगली साथ मिळेल.
कर्क :-
- दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. आळस दूर सारावा.
सिंह :-
- आपले स्वत्व राखून वागाल. मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. वेळेचा सदुपयोग करा.
कन्या :-
- बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत.
तूळ :-
- दिवसाची सुरुवात उत्साहात करा. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरातील ज्येष्ठांची संवादात्मक चर्चा करावी..
वृश्चिक :-
- बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा. आर्थिक व्यवहार सर्व बाबी तपासून करावेत. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
धनू :-
- जुन्या विचारांना थारा देऊ नका. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा.
मकर :-
- कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. जुने वाद मिटण्याची शक्यता.
कुंभ :-
- उतावीळपणे वागू नका. हातातील कामे यशस्वी होतील. जुगारातून धनलाभ संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे. संशोधन पुढे नेण्यास उत्तम काळ.
मीन :-
- बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. जुनी गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराचे व्यावहारिक चातुर्य दिसेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






