झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- तालुक्यातील जवखेडा खुर्द येथील विज कर्मचारी यास मारहाण केल्याप्रकारणी मनोज प्रताप पाटील याचे विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व विज कर्मचारी यास मारहाण केल्याप्रकरणी त्याचे विरुध्द भा.द.वि. कलम ३५३, ३३३ व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मनोज प्रताप पाटील यांना अटक करुन एरंडोल न्यायालयात हजर केले असता
न्यायालयाने मनोज प्रताप पाटील यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी मनोज प्रताप पाटील यांना न्यायालयात हजर केले मनोज प्रताप पाटील यांचेतर्फे अॅड प्रेमराज बी. पाटील व अॅड. अहमद सैय्यद यांनी जामीनाकरीता युक्तीवाद केला न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजुर करुन आरोपीची जामीनावर मुक्तता केली आहे.
आरोपी तर्फे अॅड प्रेमराज बी. पाटील व अॅड. अहमद सैय्यद यांनी कामकाज पाहीले तसेच सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डी. बी. वळवी यांनी कामकाज पाहीले.






