Pachora Rape Case : हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आजीने पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
पाचोरा : – सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच पाचोरा शहरातील एका ३० वर्षीय तरूणाने त्याच्या मुलीसोबत खेळायला आलेल्या अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील ६ वर्षीय मुलगी संशयित आरोपीच्या घरी दुपारी त्याच्या मुलीसोबत खेळण्यास गेली होती. तेव्हा आरोपी तरुणाने तिला लज्जा निर्माण होईल, असं कृत्य केले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आजीने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानुसार याबाबत पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसंच संशयित तरुणाला पोलिसांनी ताबोडतोब ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम