चोपडा (प्रतिनिधी) आदिवासी दुर्गम भागातील खेळाडूंनी आजपर्यंत क्रीडास्पर्धांच्या माध्यमातून आपले नैपुण्य वेळोवेळी भारतातच नव्हे तर जगभरात दाखविले आहे.असे खेळाडू हे मोठ्या प्रमाणात शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांमध्ये आपले शिक्षण घेत असतात.या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास विभाग यावल प्रकल्प अंतर्गत बीट स्तरावरील वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकाराच्या क्रीडास्पर्धांचे नियोजन तसेच संपूर्ण तयारीचा आढावा,समिती वाटप तसेच जबाबदारी निश्चित करणे
याबाबत तालुक्यातील सनपुले आश्रमशाळेत सर्वच शाळेतील मुख्याध्यापकांची प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीला प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकल्पाच्या शिक्षण विस्तार अधिकारी एम.आर.सुलताने ह्या होत्या.प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे या अशा पहिल्या प्रकल्पाधिकारी आहेत ज्या नेहमी आदिवासी विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही असतात.बीट अंतर्गत तयार झालेल्या समित्या आणि त्या समित्यांमध्ये काम करणारे क्रीडा

समन्वयक,पंच,शाळेतील क्रीडा शिक्षक,सहकारी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक कामकाजात आपले योग्य ते कामकाज करावे. या कामी गैरजबाबदारीने वागणाऱ्या व शिस्तीचे भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक शासन केले जाईल अशा आशयाचे निर्देश पवन पाटील यांनी दिले आहेत.सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच क्रीडा शिक्षक व संबंधित शाळेने योग्य सहभाग नोंदवून आदिवासी विद्यार्थ्यांच्या खेळाचे समर्थन करीत त्यांच्या पाठीशी खंबीर पणाने उभे राहून त्यांना पुढे जाण्याची पूर्ण संधी उपलब्ध करून द्यावी

अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुलताने मॅडम यांनी केली.आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एन.एम.पाटील व पदवीधर शिक्षक अशोक महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत आणि सत्कार केले.सूत्रसंचलन व आभार गजानन पाटील यांनी मानले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






