सोयगावला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची तालुका स्तरीय कार्यशाळा..

Spread the love

सोयगाव, दि.०२
कृषि विभाग व आत्मा यंत्रणा यांचे मार्फत सोयगावला गुरुवारी दि.१ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची तालुकस्तरीय कार्यशाळचे उदघाटन करण्यात आले.कार्यशाळेस योजनेची माहिती अमोल महाजन बी. टी. एम. आत्मा सोयगांव यांनी दिली.यावेळी अध्यक्ष स्थानी सोयगावच्या नगराध्यक्षा आशाबाई तडवी,नायब तहसीलदार व्हि. टी. जाधव, गट विकास अधिकारीप्रकाश नाईक पंचायत समिती सोयगांव यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी तालुका कृषी अधिकारी संपत वाघ,मंडळ कृषी अधिकारी जे.के जाधव आदींनी मार्गदर्शन केले.योजनेअंतर्गत बचत गट, शेतकरी महिला, शेतकरी व लघु उद्योजक यांनी सहभाग घेऊन स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत केली जाणार आहे. योजनेत शेतकरी यांनी सहभाग नोंदवून आर्थिक विकास साध्य करावा असे आवाहन सदरील कार्यशाळेत संपत. वाघ तालुका कृषि अधिकारी सोयगांव यांनी केले.केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर राबविली जात असून औरंगाबादसाठी ‘मका’ या पिकाची निवड करण्यात आलेली आहे.

त्यामुळे मका पिकाशी निगडीत असलेल्या व्यवसायासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सदरील योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामधून कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयं सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची आर्थिक पतमर्यादा वाढविण्याबरोबरच उत्पादनाचे ब्रँडिग व विपणन बळकट करण्यासाठी संघटित उत्पादन पुरवठा साखळीशी जोडण्यात येणार आहे. केंद्रित सेवांसाठी साठवणूक, विपणन व संस्थेचे बळकटीकरण तांत्रिक सहाय्य देऊन जास्तीत जास्त आर्थिक विकास शेती संलग्नीत उद्योग व उत्पादनातून शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.

यासाठी शेतकरी, महिला शेतकरी, बेरोजगार युवक, प्रगतीशील शेतकरी, मर्यादित भागीदार संस्था इ. अर्ज करू शकतात. यासाठी उद्योगात 10 पेक्षा कमी कामगार असावेत, अर्जदारचा उद्योग मालकी हक्क असावा. 18 वर्षे वय असणारा एका कुटुंबातील एक व्यक्ती पात्र असून व प्रकल्प किमतीच्या किमान 10-40 टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी. ऑनलाईन अर्जासाठी www.pmfme.mofpi.gov.in MIS Portal वर नोंदणी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावाचे कृषि सहाय्यक तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालय सोयगाव यांच्याशी संपर्क करावा.

आजच्या कार्यशाळेसाठी उमेद अभियायनांतर्गत तालुका पातळीवर कार्यरत असलेले समूह सहाय्यक कतले, राठोड व बिल्लारे तसेच गांवपातळीवर कार्यरत असलेल्या विविध सी. आर. पी. यांचे सहकार्य लाभले.

आजच्या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ए. एस. बावस्कर कृषि सहाय्यक धनवट यांनी केले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार