धरणगाव शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

Spread the love

धरणगाव :-(योगेश पाटील) धरणगाव शहरात कोरोना महामारी नंतर प्रथमतःच गणरायाचे आगमन अगदी जल्लोषात करण्यात आले असले तरी शांतता व सुव्यवस्थेच्या कारणास्तव शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून धरणगाव शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस बांधव व होमगार्ड बांधव त्याचप्रमाणे रॅपिड ॲक्शन फोर्स चे जवान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर रूट मार्च करण्यात आला.

याप्रसंगी रॅपिड ऍक्शन फोर्स चे अधिकारी उपकमांडर श्री. शशिकांत राय सहायक कमांडर श्री. संतोष यादव पोलीस निरीक्षक श्री. जी एस झारिया त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. खताळ साहेब, एपीआय. श्री.पाटील साहेब, पीएसआय. पवार साहेब, पीएसआय.श्री. गुंजाळ साहेब, पीएसआय.श्री. बेलदार साहेब तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स चे ९० जवान व धरणगाव पोलीस स्टेशनचे २० अंमलदार पोलीस बांधव व २० होमगार्ड कर्मचारी बांधव रूट मार्चमध्ये सहभागी होत

शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहील यासाठी प्रयत्नशील आहे हे निदर्शनास आले.
तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स चे जवान व आपले पोलीस कर्मचारी बांधव यांचे जागोजागी कौतुक होताना दिसून येत होते.

टीम झुंजार