जळगाव :- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद हे गुणवत्ते करिता समर्पित असलेले शिक्षकांचे संघटन आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसोबतच जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी संघटना सदैव प्रयत्न करीत आलेली आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संघटनेच्या सभासदांनी समर्पित भावनेने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव कार्यकारिणीची विशेष सभा आज माध्यमिक पतपेढी जळगाव या ठिकाणी संपन्न झाली. संघटनेमार्फत यावर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा व संविधान प्रबोधन कार्यक्रम 27 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून सदर कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचे दोन विशेष ग्रंथ प्रकाशित होणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा पुरस्कारासह यावेळेस संघटनेमार्फत राज्यस्तरीय दहा पुरस्कार सुद्धा दिले जाणार असल्याची माहिती यावेळी भरत शिरसाठ यांनी दिली. याप्रसंगी जळगाव जिल्हा पूर्व विभाग, पश्चिम विभाग, उपक्रम विभाग व महिला विभाग अशा चारही कार्यकारिणीचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला.
विभागीय कार्याध्यक्ष प्रमोद आठवले यांची माध्यमिक विभाग शिक्षक पुरस्कार निवड समिती प्रमुखपदी निवड करण्यात आली. शैलेश शिरसाठ व अजय भामरे यांची प्राथमिक विभाग पुरस्कार निवड समिती प्रमुखपदी निवड करण्यात आली. राज्य पुरस्कार निवड समिती प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष गणेश बच्छाव यांची पुरस्कार वितरण कार्यक्रम सोहळा प्रमुख पदी निवड करण्यात आली.
श्रीराम विद्यालयाच्या शिक्षिका प्रतिभा पाटील व सोपान भवरे यांची शिक्षक गौरव पुस्तिका संपादक समिती प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळेस समता शिक्षक परिषदेच्या उच्च माध्यमिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी डाॅ.प्रदीप सुरवाडकर यांची निवड करण्यात आली. विश्वनाथ पानपाटील यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. अर्थनियोजन समिती प्रमुख पदी पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे व गणेश बच्छाव यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व तालुका अध्यक्ष यांचा 2021 ते 24 च्या कार्यकारिणीमध्ये समावेश झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांचा डीएसएम परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिभा पाटील व म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील शिक्षक संदीप भंगाळे यांचा राष्ट्रवादी सेलमार्फत गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, विभागीय सहसचिव भैयासाहेब सोनवणे, पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा देशमुख, पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा छाया सोनवणे, उपक्रम विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज नन्नवरे, कार्याध्यक्ष युवराज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बच्छाव, डी. बी. पाटील, हेर्मेंद्र सपकाळे, सरचिटणीस एस.आर महाजन, सचिव शंकर भामेरे, सुधाकर मोरे, सहसचिव सोपान भवरे, एच.बी.मोतीराडे, अमळनेर तालुकाध्यक्ष बापूराव पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष चिंतामण जाधव, चोपडा तालुकाध्यक्ष सादिक तडवी, जिल्हा उपाध्यक्षा सपना रावलानी, सरिता वासवानी, अश्विनी कोळी, सचिव वर्षा अहिरराव, सहसचिव भारती ठाकरे, जळगाव महानगर अध्यक्ष टी.बी.पांढरे, प्राथमिक पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शैलेश शिरसाठ, प्राथमिक पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय भामरे, अनंतकुमार धर्मराज सुर्यवंशी, सुनील प्रभाकर वाघ, रामेश्वर अवचितराव पवार, नरेंद्र अहिरराव, कैलास पाटील, सुरेश सोनवणे, समाधान बिऱ्हाडे, शरद धनगर इत्यादी शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले चोपडा येथील शिक्षक विकास कोष्टी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.