पारोळा ( चोरवड ) :- जिल्हा परिषद केंद्र शाळा, चोरवड येथे शिक्षकदिनाच्या निमित्ताने अनेक शैक्षणिक उपक्रम साजरा करण्यात आले.याप्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनी शिक्षकांची भूमिका वठवली.शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु.उमंग प्रशांत पाटील याच्या वाढदिवसानिमित्त व शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रशांत अरूण पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र पुस्तक, पेन्सिल-खोडरबर-शॉर्पनर देऊन मुलाच्या वाढदिवसाच्या आनंदात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले.
श्री.प्रशांत पाटील यांच्या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय चौधरी यांनी कौतुक करत समाजाच्या सहकार्याने शाळेचा विकास साधणे शक्य होईल असे मत व्यक्त केले.उपस्थित ग्रामस्थांनी शालेय प्रशासन, शालेय गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी अरुण नामदेव पाटील, भाऊसाहेब रामदास पाटील,राहूल अरुण पाटील, विजय भिमराव पाटील, मल्हार प्रल्हाद कुंभार, जितेंद्र पंडित पाटील, सोपान हरी पाटील,भुषण नागो पाटील, विनोद रविंद्र पाटील, अविनाश दिलीप पाटील, कल्पेश संजय पाटील,दिपक आनंदा न्हावी, जितेंद्र प्रदिप पाटील, शाळेतील शिक्षक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम