मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भाईंदर मधील “नवयुवक मित्र मंडळ” यांच्या नवघरच्या राजाचा २१ व्या वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव राबविण्याचा संकल्प. नवघरच्या राजाची मूर्ती ७५००० टिश्यूपेपर पासून बनवलेली आहे. या मूर्तीचे वजन ६५ किलो आहे आणि उंची १४ फुट आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी १५ किलो स्टील, १५ किलो खडू पावडर तसेच १०-१२ किलो गम, डिस्टेंपर आणि अमेरिकन पेंट वापरण्यात आला आहे. ही मूर्ती उचलायला एकदम हलकी आहे तसेच ही मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळू शकते.
हिंदू धर्मात बरेच सण एकत्र येऊन साजरे केले जातात. पण भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठया प्रमाणात सर्व भाषिक एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करताना आपण पाहतो. मात्र आजकाल साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र आज लक्ष देण्याची वेळ आली आहे. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल.
पर्यावरणाचे रक्षण करण्याची राज्य शासनाची जबाबदारी असली तरी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोणतेही सामाजिक बदल आपल्याला आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो.
गणेशोत्सवाच्या काळात जलप्रदूषण मोठया प्रमाणावर होते. हे प्रदूषण थांबविणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे यासाठी नवयुवक मित्र मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबविली आहे, अशाच पर्यावरणपूरक संकल्पना सगळ्यांनी राबवून आपला खारीचा वाटा उचलावा अशी कळकळीची विनंती सुनिल जंगले (सचिव) यांनी केली आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.