झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
भिगवण :- ( ता. इंदापूर )
भिगवण वनविभाग हद्दीतील मदनवाडी या गावातील प्रगतशील शेतकरी व युवा उद्योजक अभिमन्यू घुंबरे यांच्या प्रसंगावधानामुळे आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या जखमी नर जातीच्या मोरास जीवदान मिळाले आहे…
सविस्तर माहिती अशी की शनिवारी ता.३ सप्टेंबर रोजी अभिमन्यू घुंबरे हे आपल्या पत्नीसह शेतात गेले असता त्यांना मोर हा जखमी अवस्थेत आढळून आलाा. त्यांनी कोणताही वेळ न घालवता भिगवण येथील सर्पपमित्र(वन्यजीव प्रेमी) गौतम शेलार व विराज पुजारी यांना संबंधित जखमी मोराची माहिती दिली .
माहिती मिळताच तात्काळ शेलार व पुजारी हे घटनास्थळी दाखल झाले… त्यांनी जखमी मोरास उचलून प्राथमिक पाहणी व प्राथमिक उपचार केले व पुढील वैद्यकीय उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले.या घटनेची माहिती भिगवण वनविभागाचे कर्मचारी श्री.उल्हास मोरे यांना दिली. सदर जखमी मोरास पशुवैद्यकीय अधिकारी श्री.संतोष भारती यांनी उपचार केले…सदर मोरास २ दिवस विशिष्ट देखभाल करून तो मोर वनविभागाच्या ताब्यात देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडणार असल्याचे गौतम शेलार यांनी सांगितले..
गौतम शेलार यांनी सांगितले की मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. मोर जा कुक्कुटवर्गीय पक्षी आहे, तसेच मोर हा सर्वभक्षीय पक्षी देखील आहे.(त्यात उंदीर, साप, किडे,पाली,सरडे हे खातो.)निसर्गाच्या अन्नसाखळी व अन्नसाखळी चा समतोल राखण्यामध्ये मोराचे महत्वाचे योगदान आहे.सध्या वाढत्या शहरीकरणामुळे, व वृक्षतोडीमुळे या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
आणि त्यामुळेच ते अन्न आणि पाण्याच्या शोधात मानववस्तीमध्ये येत असतात. जर आपल्याही परिसरात कोणताही वन्यजीव,पशू, पक्षी,साप जखमी किंवा आढळून आल्यास जरुर आम्हाला कळवा असेही त्यांनी सांगितले. गौतम शेलार व त्यांच्या टीम ने आज पर्यंत अनेक हजारो साप, जखमी पशु,पक्षी यांना जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहेत.. विशेष त्यांनी ही बाब बोलून दाखवली की त्यांच्या आमच्या या कार्याची कोणतेही समाजमाध्यम,प्रचारमाध्यम दखल घेत नाही..भिगवण व भिगवण परिसरात त्यांचे महत्वाचे योगदान आहे ,तेंव्हा आपणही त्यांच्या कार्यास हातभार लावून साप, जखमी प्राणी पक्षी यांचा जीव वाचवू शकता…
भिगवण व भिगवण परिसरासाठी संपर्क करा.
- गौतम शेलार..९९६०९८७७४३
- विराज पुजारी..९९६०३९६९०४
- दत्ता कुंभार..७८४१०१८५६६
- प्रमोद सूर्यवंशी..८९७५३७४७३१
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






