“राग आल्यावर मी काहीही करू शकतो, आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”

Spread the love

औरंगाबाद : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे त्यामुळे सर्व राजकीय नेते एकमेकांनवर आरोप प्रत्यारोप करत आहे अश्यातच चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्या वर जोरदार टीका केली आहे म्हणाले की “गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार” असं वक्तव्य औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

दरम्यान, शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर गुवाहाटीला गेल्यावरचा एक अनुभवही पाटलांनी सांगितला होता. गुवाहाटीला गेल्यावर घरच्यांनी परत या परत या म्हणत फोन केले. पण आता आम्ही परत येत नाही, असं आम्ही ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अलिबाबा के चालिस चोर तसं आम्ही शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत, असंही पाटील म्हणाले होते. त्यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका खैरे यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गुलाबराव पाटील यांच्यानंतर खासदार नवनीत राणा यांनीसुद्धा ठाकरेंवर निशाणा साधत, “तुम्ही जर उद्धव ठाकरे असाल तर मी सुद्धा राणा आहे, हिंमत असेल तर मैदानात या.” असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर खैरे यांनी बोलताना म्हटलं की, ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती पिक्चरमध्ये सिगरेट पिते, कसे कसे फोटो काढते, कपडे कशी घालते?” अन् ती आम्हाला काय शिकवणार? असं वक्तव्य खैरे यांनी केलं आहे.

दरम्यान, दोन्ही गटातील शाब्दिक वाद आता शिगेला पोहोचला असून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बुलढाण्यात संजय गायकवाडांच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर गायकवाड यांनी ठाकरे गटाला उघड धमकी दिली होती. त्यानंतर आता एकमेकांवर आरोप प्रात्यारोप केले जात आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार