लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाचे असलेले बिबी ग्रामपंचायत कार्यालय च्या प्रगणात ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत सर्वानुमते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व माजी सरपंच विठ्ठल आटोळे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष शेख रियाज यांची निवड करन्यात आली.यावेळी गावातील नागरिक तसेच गावच्या सरपंच चंदाबाई गुलमोहर,उपसरपंच भास्कर खुळे,सचिव फुपाटे,दिलीप बनकर,आमोल मुळे, ह.भ.प.गजानन महाराज इंदोरिया,विठ्ठल देवकर, गजानन काकडे,भिकाजी इगळे,सुनिल इंगऴे,शेख समद, सरपंच पुत्र तथा समाजसेवक दिपक गुलमोहर,पत्रकार भागवत आटोऴे गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवक, महिला वर्ग मोठया संख्ये ने उपस्थित होते.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या तंटय़ांबरोबर नव्याने निर्माण झालेले तंटे मिटविण्याची जबाबदारी देखील तंटामुक्त गाव समितीवर आहे.गावात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून समिती प्रतिबंधात्मक उपाय करते. पण, तरी काही तंटे निर्माण होतात.त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






