आजचे राशीभविष्य, ( बुधवार ७ सप्टेंबर २०२२ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी व्यवसायात किंवा – घरी मतभेद होतील.

वृषभ :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज कामाचा खूप व्याप व खाण्या-पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.

मिथुन :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण राहील. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल व लोकप्रियता वाढेल. व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल. दांपत्यसुखाची प्राप्ती होईल.

कर्क :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकाल.

सिंह :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल. गूढ व रहस्यमय विद्येकडे कल होईल.

कन्या :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहावे.

तूळ :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपसातील संबंध सुधारतील.

वृश्चिक :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल.

धनू :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी निर्माण होईल. समाजात यश व कीर्ती वाढेल.

मकर :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. खूप कष्ट व कमी यश यामुळे निराशा निर्माण होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. दांपत्य जीवनात खटका उडेल.

कुंभ :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. पत्नी व संतती कडून सुख समाधान लाभेल. एखादा प्रवास किंवा सहल संभवते. विवाहेच्छुउकांचे विवाह ठरतील. शरी व मन आनंदी राहील.

मीन :-

  • धनु राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील व वडीलधाऱ्यांकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. घरात सुख शांती नांदेल. प्रगती संभवते. सरकारकडून लाभ होईल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार