प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल -माझी वसुंधरा अभियान 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या निमित्ताने नुकतीच एरंडोल नगर परिषद एरंडोल यांच्याकडून दादासाहेब पाटील महाविद्यालय या ठिकाणी संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आद्यवत करण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डन , vermi कंपोस्ट प्लांट (गांडूळ खत प्रकल्प), सोलर पॅनल (सौर ऊर्जा प्रकल्प), रेन वॉटर हार्वेस्टिंग (पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प) वृक्ष लागवड या विविध माझी वसुंधरा घटकांची पाहणी व संपूर्ण माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे व न.पा.अधिकारी यांनी जाणून घेतली. न.पा.द्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये दादासाहेब पाटील महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले.
त्याअनुषंगाने आज न.पा. कमीटीने महाविद्यालयाची पाहणी केली असता महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर हा पर्यावरण पूरक पद्धतीने नटलेला आहे. त्यावरून एक निदर्शनास असे येते की, महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ तसेच विद्यार्थी हे सर्व पर्यावरण संवर्धनासाठी नवीन नाविन्यपूर्ण माहिती व इको फ्रेंडली प्रकल्प राबवत असतात. यासाठी संस्थेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोत्साहन देत असतात.माझी वसुंधरा अभियानांतर्गत येणाऱ्या अग्नि, पाणी, जल, वायू व माती या पाचही घटकांचा समावेश या महाविद्यालयाच्या परिसरात अनुभवायला मिळतो. जसे की, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड व संवर्धन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, महाविद्यालयातील कचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत तयार करणे, पाणी बचतीसाठी इमारतीच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग, वीज बचतीसाठी छतावर सोलर पॅनल बसविण्यात आलेले आहे.
महाविद्यालय पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेले कार्य त्यांनी असंच दीर्घकाळ सुरू ठेवावे, यातून एरंडोल वासियांना व विद्यार्थ्यांना, पर्यावरणसंबंधित प्रेरणा नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब यांनी केले.तसेच यावेळी पाटील महाविद्यालय, संस्थाअध्यक्ष अमित पाटील, प्र. प्राचार्य प्रा. एन. ए.पाटील यांसर्वांना पर्यावरण दुत पुरस्कार देऊन नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब यांनी सन्मानित केले.
संपूर्ण बोटानिकल गार्डनमधील वृक्षलागवडीचे प्रकार व वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एम. साळुंखे यांनी सर्वांना दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. के. जे. वाघ, डॉ. मीना एन.काळे डॉ. एस. एल. पाटील मॅडम, प्रा. एस.जे. सजगणे, प्रा. ए.एन.पाटील प्रा.एस.पी. वसावे, प्रा. सागर ए. पाटील संपूर्ण भेटीदरम्यान हजर होते.
फोटो ओळ :- नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याहस्ते पर्यावरण मित्र पुरस्कार स्वीकारतांना अमित पाटील,प्रा एन ए पाटील व इतर मान्यवर