प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- इंदापूर तालुक्यातील कळंब येथील वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज सातत्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी नेहमी चर्चेत असते व विद्यालयाला भेट देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी वर्गही सातत्याने इच्छुक असतात.त्याचे कारणही तसेच कौतुकास्पद असून राज्यासह देशपातळीवर कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थी चमकत असतात तसेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध पदांवरती याच विद्यालयातील पन्नासहून अधिक विद्यार्थी आपल्या कामगिरीने कार्यरत असून इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंब हे विद्यालय गेली कित्येक वर्षे इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये आपली परंपरा कायम ठेवून आहे.

आज इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार श्री ठोंबरे साहेब,बारामती निर्भया पथकाचे महिला भरारी पथक संरक्षक दलाच्या प्रमुख सौ अमृता भोईटे, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे भरारी पथकाचे प्रमुख पी एस आय मिटापल्ली साहेब, इंदापूर तालूका पुरवठा अधिकारी श्री दिपक पवार यांनी वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंबला भेट देऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.

याप्रसंगी उपस्थित अधिकारी वर्गाचे विद्यालयाचे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम यांनी शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री बी.के.सर्वगोड, पर्यवेक्षक श्री राजेंद्र माळवदकर सर,माजी क्रिडा शिक्षक श्री रामदास शेलार सर, ज्यूनिअर विभाग प्रमुख श्री सचिन सावंत सर,प्रा.श्री सुरेश अर्जून सर,श्री गलांडे सर ,श्री बोंद्रे सर,श्री काशिद सर,सौ.पाटील मॅडम,सौ करगळ मॅडम, सौ हजारे मॅडम यांच्यासह वालचंद विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






