प्रतिनिधी – संतोष कदम.
नातेपुते :- नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे शासकीय दौऱ्यावर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन सोयी सुविधांची माहिती घेण्यासाठी आले असता नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते व कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना भेटून निवेदन दिले. निवेदनात माळशिरस तालुक्यातील सर्वजाती धर्मांच्या नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळावेत,योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये रुग्णांकडून अतिरिक्त पैशांची मागणी करतात अशा रूग्णालयांवर कारवाई करण्यात यावी.
अंगीकृत खाजगी रुग्णालयात सर्वच आजारांवर मोफत उपचार मिळावेत.माळशिरस ग्रामीण रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्वच आजारांवर मोफत उपचार मिळावेत.उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे रुग्णांची हेळसांड होत असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यावर कारवाई करावी.योजनेचे तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक जाणून बुजुन कसूर करीत आहेत त्यांची चौकशी करावी.

योजनेचा प्रसार प्रचार करावा.इत्यादी मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना भेटून वैभव गिते यांनी दिले आहे.तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे.
माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते,जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर,माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर,तालुका आरोग्य अधिकारी मोहिते,माजी वैद्यकीय अधिकारी एम.पी.मोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संपांगे,नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व्होरा मॅडम,रिपाइंचे नातेपुते अध्यक्ष संघर्ष सोरटे,नवनाथ भागवत, अक्षय भागवत हे उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






