तालुक्यातआंँटींजन टेस्टमध्ये 9 आर टी पी सी आर मध्ये 1 असे 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह.
एरंडोल तालुक्यातील 434 रुग्णांचा आर टी पी सी आर टेस्ट अहवाल पेंडिंग
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-येथे आज दिनांक 16 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 7 रूग्णांचे एंटीजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील एकाच परिवारातील 4 व अन्य 2 असे 6 रुग्ण व कासोदा येथे कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी आलेल्या 3 युवकांच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.एरंडोल शहरातील एक रुग्णांचा अहवाल rt-pcr मध्ये पॉझिटिव आढळून आला आहे. असे एरंडोल तालुक्यातील एकूण 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एरंडोल शहरातील नवीन वसाहत परिसरातील बचपन स्कूल जवळील परिसरातील एकाच परिवारातील 60 वर्षीय पुरुष,50 वर्षीय महिला,27 वर्षीय युवती,25 वर्षीय युवक असे एकाच परिवारातील चार तसेच दत्त कॉलनी परिसरातील 66 वर्षीय पुरुष, गजमल नगर परिसरातील 37 वर्षीय महिला असे एरंडोल शहरातील 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेले 17 वर्षीय 3 युवक यांची कोरना टेस्ट घेण्यात आली, यामध्ये तिन्ही युवक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
असे रविवारी घेण्यात आलेल्या कोरोना आंँटींजन टेस्टमध्ये 9 व आर टी पी सी आर मध्ये एरंडोल शहरातील 40 वर्षीय महिला चा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. असे एकूण 10 रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत. पॉझिटिव आलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षण असल्यामुळे त्यांना आपापल्या घरीच होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.एरंडोल तालुक्यातील 434 रुग्णांचा आर टी पी सी आर टेस्ट अहवाल पेंडिंग आहेत यांच्यामध्येही अनेक रुग्ण कोरोना पॉझिटिव येण्याची शक्यता आहे