लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- शहरात दर सोमवारी भरणारा गुरांचा बाजार बंद.जनावरावरील वरील लंपी रोग नियंत्रणासाठी गुराचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोजातीचे व प्रजातीचे गुरे व म्हशीच्या कोणताही प्राणी बाजार भरवणे,प्राण्यांचे शर्यती लावणे,प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीचे प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित घेऊन कोणतेही कार्यक्रम पाडण्याची सक्त मनाई करण्यात आली आहे. जोपर्यंत लंबी रोगावर नियंत्रण प्रतिबंध किंवा निर्मूलन करता येणार नाही,पुढच्या आदेशापर्यंत हे नियम लागु राहतिलं.
सध्या स्थितीत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील काही गावांमध्ये लंपी हा रोग जनावरांमध्ये पसरत आहे. सदरील रोगा विषाणूजन्य असून संसर्गजन्य आहे.या रोगाचा प्रसार चावणाय्रा मच्छर,गोचीड,डास,चिलटे तसेच बाधित जनावरामुळे दूषित पाणी व चारा प्राशन केल्याने होते.या रोगाची लक्षणे जनावरांच्या अंगावर 10 ते 50 मि.मी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीला भरपूर ताप येतो डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव होतो,जनावरांचे दूध उत्पादन कमी होते.काही जनावरांचे पायाला सूज येऊन जनावर लंगडते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये डास,माशा,मच्छर, गोचीड यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.हा साथीचा रोग असेपर्यंत जनावरांची खरेदी-विक्री करू नये.त्याचप्रमाणे पशुपालकाने लंपी सदृश्य लक्षणे आढळल्यास जनावरांना तात्काळ निरोगी जनावरापासून वेगळी करावे. गोठ्यामध्ये सोडियम हायड्रो क्लोराइड 2 ते 3% द्रावण फिनाईल 2% किंवा फोर्मलीन 1%ची फवारणी करावी.
या रोगापासून जनावरे वाचवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने गावामध्ये जनजागृती करून गावातील पशुपालकांना याविषयी माहिती द्यावी.त्याचप्रमाणे लंपी सदृश जनावरे आढळल्यास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधावा.जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करून या रोगाविषयी माहितीचा प्रसार आणि प्रचार करावा.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






