दुर्दैवी : कांताई बंधाऱ्यावर पिकनिकला गेलेले चौघे पाण्यात बुडाले , तिघांना वाचविण्यात यश,एक तरुण बेपत्ता.

Spread the love

भाऊ-बहिणीसह तिघं बचावले, जळगावातील तीन दिवसातील दुसरी घटना

जळगाव : – जळगाव शहरातील दूध फेडरेशनजवळ राहणाऱ्या १५ ते २० वर्षीय तरुण-तरुणींचा गट आज कांताई बंधारा, नागाई-जोगाई परिसरात आले होते. पाण्यात पोहताना चौघे बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी इतरांना धाव घेतली. घटनेत चौघांना वाचविण्यात यश आले असून नयन निंबाळकर (वय-१६) हा अद्याप मिळून आलेला नाही.

रविवारची सुट्टी म्हणून कांताई बंधाऱ्याकडे पिकनिकला गेलेले योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४) या बहिण भावासह समीक्षा विपीन शिरोडकर (वय १७) व नयन योगेश निंबाळकर (वय १७) सर्व रा. मिथीला अपार्टमेंट, दूध फेडरेशन, जळगाव) ही चार मुले दुपारी पाण्यात बुडाले. नयन वगळता अन्य तिघांना वाचविण्यात यश आले आहे. नयनचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. तिघांवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथीला अपार्टमेंटमधील १२ ते १५ मुलं-मुली सण्डे पिकनीक म्हणून तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाऱ्यावर फिरायला गेले. तेथे फिरणं झाल्यानंतर गिरणा नदीत नागाई जोगाई मंदिर परिसरात पाण्यात उतरले. तेथे फोटो सेशन केले. पाण्याचा अंदाज न आल्याने योगीता व सागर या बहिण भावासह समीक्षा शिरोडकर व नयन निंबाळकर हे पाण्यात बुडाले. हा प्रकार इतर सहकारी मित्रांनी चौघांनी वाचविण्याचा प्रयत्न केले.

त्यात तिघांना बाहेर काढण्यात यश आले तर नयन वाहून गेला. मनपा व स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने नयनचा उशिरापर्यंत शोध सुरु होता. दोन दिवसापूर्वीच कांताई बंधाऱ्यावर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या भगवान नामदेव राठोड (वय १८, रा. समता नगर) या तरुणाचा कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर लागलीच आज पुन्हा चार मुलं बुडाले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार