जळगाव : – महिला आणि मुलींसंबंधी कितीही जनजागृती केली तरी महिलांवरील अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशात जळगावमध्ये नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका वडिलांनी मुलीसोबत असं काही केलं की वाचून तुम्हीही संतापाल.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जळगावमध्ये समोर आली आहे. इथे एका वडिलांनी १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत भयंकर प्रकार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षापासून हा घाणेरडा प्रकार सुरू होता. यासंबंधी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बापाला अटक करण्यात आली आहे. आईला घराबाहेर काढून देईन अशी धमकी देत बापाने अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाना प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरू होता. यात बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढून देईल, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी हा सर्व प्रकार सहन करत होती. परंतू मागील काही दिवसांपासून प्रकार वाढल्यामुळे त्याला पीडित मुलगी कंटाळली आणि तिने सर्व घटना तिच्या आईला सांगितली.
आईने आपल्या भावांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ संशयित बापाला अटक केली आहे तर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






