27 People Sitting Car News
लंडन :- गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी लोक काहीही करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये २७ लोक पाच सीटर मिनी कूपर कारमध्ये (Car) बसताना दिसत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक अंग मुरडत कारमध्ये शिरताना दिसत आहेत. गाडीत जाण्यासाठी स्वयंसेवकांची रांग असते आणि मग एक एक करून २७ जण आत जातात.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) हा व्हिडिओ ६ सप्टेंबर रोजी ट्विट केला होता. खरंतर हा व्हिडिओ ८ वर्ष जुना आहे. यूकेमध्ये हा व्हिडिओ शूट केला गेला होता. रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. परिस्थिती अशी होती की सीटवर बसलेल्या लोकांच्या वरती लोक बसले होते. त्यामुळे गाडी (Car) पूर्णपणे भरली होती.
इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करीत होते. एका युजरने लिहिले, अपघात होईपर्यंत ही सर्व मजा आहे. नुकतेच अमेरिकेतील एका व्यक्तीने एका मोठ्या भोपळ्यात बसून ६१ किलोमीटरचे अंतर कापले होते. त्यांनी स्वतः भोपळाही पिकवला होता. हे सर्व केवळ वर्ड रेकॉर्ड तयार करण्यासाठी केले गेले.
भारतात ऑटोमध्ये २७ लोक बसले
जुना व्हिडिओ पाहून लोकांना खूप मजा येत होती. मात्र, भारतात अशा घटना रस्त्यांवर होताना दिसतात. जुलैमध्ये एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये २७ लोक एका ऑटोतून खाली उतरले होते. हे पाहून पोलिसही अचंबित झाले. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील बिंदकी कोतवाली येथील आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल जवळ उभ्या ट्रॅक मधून २ लाख ३५ हजार किमतीचे मोटार पंप अज्ञात चोरट्यांनी केले लंपास.
- अमळनेर तालुक्यात तापी नदीत बुडून दोन शाळकरी मुलांच्या मृत्यू,दोन दिवसापासून पांच मुलं जायची पोहायला पण गावात लग्न असल्याने तीन राहिले होते घरी.
- Viral Video: एका बॉयफ्रेंडसाठी भरगर्दीच्या ठिकाणी चार तरुणी आपापसांत भिडल्या एकमेकींना झिंज्या उपटत लाथा-बुक्क्यांनी हाणामारी पहा व्हिडिओ.
- प्रियकराने केली प्रेयसीकडे पैश्याची मागणी,म्हणून ती ज्या घरात नोकरी करते तेथून चोरल्या हिऱ्याच्या अंगठ्या; प्रेयसीला पश्चिम बंगालमधून अटक.
- ३ मुलांची आईच्या सासऱ्यावर जीव जडला,अन् एक दिवशी सुनेला घेऊन पळाला; नवऱ्याने केली घोषणा शोधणाऱ्याला २०००० रुपये देणार