लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील सुलतानपूर येथे गावातील रस्ते,नाल्या,मुरूम,पथ दिवे लाईट, बोरखेडी रोडचे अर्धवट काम पूर्ण करणे,सुलतानपूर ते वेणी अंतर्गत ठेकेदारांनी केलेले बोगस कामाची चौकशी करणे,नवीन स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देणे आठ ते दहा दिवसातून येणारे पाणी एक दिवस आड सोडावे,मागासवर्गीची मरीमाय असलेली देवी त्या ठिकाणी जाण्यासाठी अंतरी पांदन रस्त्यावर केलेले अतिक्रमण खुले करणे,या अशा विविध न्याय मागण्या घेऊन संघपाल नागवंशी पनाड, अख्तर भाई, अनित्य घेवंदे,संतोष पाटील शिंदे,मन्नान भाई पटेल, शेख अमीर भाई, यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण गावकरी या मोर्चामध्ये सामील होऊन गेल्या 40 ते 50 वर्षापासून ज्या समस्यांनी सुलतानपूर ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष केले होते त्या समस्ये कडे लक्ष वेधून मार्गी लावण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला,त्यामध्ये गावातील महिला पुरुष लहान बालक सहभागी झालेळयामध्ये अनेकांनी आपल्याला होणाऱ्या समस्या या ठिकाणी मांडल्या अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या समस्या बाबतचे मनोगत व्यक्त केले त्यामध्ये,संघपाल नागवंशी पनाड मन्नान भाई पटेल अनित्य घेवंदे,मा.सरपंच पुरुषोत्तम गाडेकर,बिंबिसार पनाड ,दस्तगीर भाई व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत समोर जन आक्रोश करत विविध समस्या बाबतच्या चर्चा ग्रामपंचायत सचिव यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
त्यानंतर त्यांनी सांगितले की मुरूम टाकण्याला सुरुवात सुरू झाली धूर फवारणीने ला सुद्धा सुरुवात करण्यात आली. उर्वरितच्या समस्या ज्या आहेत त्या तत्काळ मार्गी लावण्यात येतील.असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले.
यावेळी उपस्थितांमध्ये माजी सरपंच पुरुषोत्तम गाडेकर,भानदास पवार,नागसेन पनाड,शरद पवार पाटील,अनंता टकले, राजू राऊत, साहेबराव झोरे , जावेद शेखलाल,विशाल पनाड,किरण पनाड,अतिश पनाड ,राजहंस जावळे, प्रसेंजित पनाड,बबन पनाड रमेश आनंदराव सुभाष पनाड, संजाब बेपारी पनाड,अशोक महाराज पनाड,साहेबराव वानखेडे यांच्यासह अन्य ग्रामस्थ जन आक्रोश मोर्चाला हजर होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






