यावल : – सध्या महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यात अवैध रीत्या हत्यार तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अश्यातच मध्य प्रदेशातील बहेरामपुरा (जि. खरगोन) येथील पिस्तूल विक्रेत्यास गुन्हे शाखेच्या पथकाने यावल बसस्थानकावर अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून विक्रीसाठी आणलेल्या पिस्तुलासह दुचाकी ताब्यात घेण्यात आली असून, यावल पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गोलूसिंग दिलीपसिंग भाटिया(वय २८, रा. शिनगूर, पो. बेहरामपुरा, खरगोन) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तपासात महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
सातपुडा पर्वतामधून दुर्गम दऱ्याखोऱ्यांसह मध्य प्रदेशातील काही सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर गावठी पिस्तूल महाराष्ट्रात विक्रीसाठी आणल्या जातात. सोमवारी (ता. १२) असाच एक विक्रेता पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील सुनील दामोदरे, दीपक पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान तुकाराम पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी या पथकाने यावल बसस्थानक परिसरासह इतर दोन ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार होंडा शाइन (एमएच १०, एनजी ९४०) या दुचाकीवर चोपडाकडून अडावदच्या दिशेने जाणाऱ्या तरुणाला पथकाने थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या कंबरेला एक गावठी पिस्तूल मिळून आले आहे.
पिस्तुलासह त्याची दुचाकी जप्त करून त्याला ताब्यात घेतल्यावर यावल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन