नाशिक : – सध्या महाराष्ट्रात मारहाण झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. व त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतोय असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ् व्हायरल होत आहे. त्यातील काही व्हि़डीओ तुफान शेअर होत असतात. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर झालेली हाणामारी पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर झालेल्या वादाचा आहे. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो. सतत चर्चेत असणाऱ्या या टोल नाक्यावर मारामारीचा प्रकार घडला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडिओ :
वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारीही झाली. काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर टोल कर्मचारी यांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने दोन्ही तक्रारदार यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर वाद मिटवत सबुरीचा सल्ला दिला. माफीनामा लिहून देत वादावर पडदा टाकण्यात आला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






