हुंडा नको मामा , फक्त मुलगी द्या मला ! मामाचा पोरगी देण्यास नकार ; संतापलेल्या भाच्याने असं काही केलं की सगळंच संपल…

Spread the love

नांदेड : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच मामा भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अर्धापूर तालुक्यात उघडकीस आली आहे लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाच्याने रागाच्या भरात आपल्या मामाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली असून आरोपी तरुण हा आपल्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या मामाने या लग्नाला नकार दिला होता. अनेक प्रयत्न केल्यावरही मामा लग्नाला तयार न झाल्याने अखेर आरोपी तरुणाने आपल्या मामाची कुऱ्हाडही वार करून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्द्धापुर तालुक्याच्या छाबरा गावात ही घटना घडली. एकनाथ बंडू जाधव (वय 19 ) असे या मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी एकनाथ जाधव याला अटक केली असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणाचा कसुन तपास करत आहे.

भाचा काहीच काम करत नसल्यामुळे मामांनी लग्नासाठी दिला होता नकार.

आरोपीला त्याचे मामा बालाजी काकडे यांच्या मुलीशी लग्न करायचे होते. त्याने यासाठी अनेकदा त्यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. यावेळी ‘तू काही काम करत नाहीस’, असे म्हणत मामाने एकनाथला मुलगी देण्यास नकार दिला. मात्र, एकतर्फी प्रेमात आंधळा झालेल्या या तरुणाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मामाला आपल्या रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची हत्या केली.

9 सप्टेंबरला रात्री बालाजी काकडे हे आपल्या घराच्या बाहेर झोपले होते. याचवेळी आरोपी कुऱ्हाडी घेऊन आला आणि त्याने क्रूरतेने त्याच्या मामावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने घटनेची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

लग्नास मुलगी दिली नाही म्हणून केली हत्या

रोजगारासाठी रोडगी येथील बालाजी काकडे हे गत पन्नास वर्षांपूर्वी चाभरा येथे स्थायिक झाले. त्यांना या ठिकाणी चांगला रोजगार मिळत होता सर्व काही चांगले होते. त्यांची बहीण वनिताबाई बंडू जाधव हे मुळगाव सांडस ता.कळमनुरी येथील असून त्यांना तेथे रोजगार मिळत नसल्याने तेही चाभरा येथे कामानिमित्त आले व पंधरा ते वीस वर्षाखाली स्थायिक झाले. दोन्ही कुटुंबे रोज मजुरी करून आपला उदारनिर्वाह चालवत असे. बालाजी काकडे यांना दोन मुली असून त्यांचा भाचा एकनाथ जाधव यांने मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथ कुठलेही काम करत नसल्यामुळे मामांनी नकार दिला. मामाने मुलगी देण्याचा नकार दिल्याचा राग मनात ठेवत संतापलेल्या भाचा एकनाथने मामाची हत्या केला होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले व घटनेनंतर तीन दिवसांतच आरोपीस मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार